Monday, September 26, 2011

आम्ही मराठी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
कवी - सुरेश भट

Friday, September 23, 2011

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.
कुणी'Orkut'वर तर कुणी'Facebook' वर जमतात. 
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.
कारण सगळे विषय'Chat'वरच संपलेले असतात.
मग'Chat'वर भेटूच याचं'Promise'होतं.
आणि संभाषणातून 'Sign out' केलं जातं.
‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्य ा गर्दीत मग हरवायला होतं.
घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.
'Available '’ आणि'Busy'मध्ये
प्रत्येकाच ा'Status'घुटमळत राहतो.
आपणहून'Add'केलेल्या मित्रापासू न लपण्याकरिता 'Invisible 'चा आडोसा घेतला जातो.
ताप आल्याचं आजकाल आईच्या आधी'Facebook' ला कळतं. 
औषधापेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं.
मनातलं सगळं'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net' ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.
'Chat' ला गप्पांनी आणि'Smile'ना हास्यांनी'Replace'करावं.
शब्दापेक्ष ा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं.
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच ्या हातात असतं.
चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवूया. मैत्रीला ' Technology' पासून जपून ठेवूया

Thursday, September 22, 2011

प्रिये,


तुझ्या आठवणींनी माझे मन पाण्यात
टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदखदते आहे.
प्रत्येकवेळी “O2″ आत घेताना आणि “CO2″ बाहेर
सोडताना मला तुझीच आठवण येते.
तुला हातात ठेवण्याचा कितीही प्रयत्न
केला तरीसुद्धा तु हवेत
उघड्या ठेवलेल्या ‘नेप्थॅलीनप्रमाणे’ उडुन
जातेस. त्या विरहात माझे ह्र्दय
‘यलो फॉस्फरस’ प्रमाणे भुर्कन जळुन गेले. तु
असशील तेथुन लोहकणांसारखी चुंबकाकडे
आकर्षित हो !
मला अजुन ते दिवस आठवतात,
जेव्हा प्रयोग शाळेत बसून
मी तुझ्या डोळ्यांतील “अल्कोहोल” पीत
असे. त्या नाजुक ओठातील ‘ग्लुकोज’
खाण्याचा मोह मला अनेक
वेळा टाळावा लागला. ‘ऍक्टीव्हेटेड
कंपाऊंड’ प्रमाणे असणारे तुझे सरळ केस,
एका ओळीत लावलेल्या ‘टेस्ट ट्यूब’ प्रमाणे
तुझे सुंदर दात, तुझ्या नाकातील
चमकी’Ring Test’मध्ये येणाऱ्या Ring
प्रमाणे भासे , तर कानातील रिंगा ‘
physical balance’ मधील
पारड्याप्रमाणे लटकत असत.
दोन वेगळे रंग दाखवणाऱ्या ‘लिट्मस
पेपरप्रमाणे’ तुझी व्रुत्ती आहे, हे माहीत
नव्हत मला. आपण ‘बेन्झीन’ आणि ‘ऑईलचे’
मिश्रण आहोत हे माहीत नव्हत मला.
आता सारेच संपले आहे.
तुझ्या प्रिलिमनरी टेस्ट्मध्ये पास
होऊनसुद्धा.
 
तुला धरणारा ब्युरेट स्टॅंण्ड....
 
आंतरजालावरून साभार..........

Tuesday, September 20, 2011

कविता को पढने से पहले....
ये कविता हमारे भारत माता के शान मे लीखी गई है ईस मे बदलाव करने के लीये मै तहेदीलसे माफी चाहता हुं. मे ईसे मेरे दील पर पथ्थर रखकर ये कविता पोस्ट कराता हुं......

आओ बच्चों तुम्हें दिखाए झाकी घपलिस्तान की.
इस मिट्टी पे सर पटको ये धरती है बेईमान की.
बंदी में है हम, बंदी में है हम ....!!!

उत्तर में घोटाले करती मायावती महान है
दक्षिण में राजा-कनिमोझी करुणा की संतान है.
जमुना जी के तट को देखो कलमाडी की शान है
घाट-घाट का पानी पीते चावला की मुस्कान है.
देखो ये जागीर बनी है बरखा-वीर महान की
इस मिट्टी पे सर पटको ये धरती है बेईमान की.
बंदी में है हम, ...बंदी में है हम...!!

ये है अपना जयचंदाना, नाज़ इसे गद्दारी पे.
इसने केवल मूंग दला है मजलूमों की छाती पे.
ये समाज का कोढ़ पल रहा, साम्यवाद के नारों पे
बदल गए हैं सभी अधर्मी भाडे के हत्यारे में .
हिंसा-मक्कारी ही अब,पहचान है हिन्दुस्तान की.

इस मिट्टी पे सर पटको ये धरती है हैवान की.
बंदी में है हम...बंदी में है हम....!!

देखो मुल्क दलालों का, ईमान जहां पे डोला था.
सत्ता की ताकत को चांदी के जूतों से तोला था.
हर विभाग बाज़ार बना था, हर वजीर इक प्यादा था.
बोली लगी यहाँ सारे मंत्री और अफसरान की.

इस मिट्टी पे सर पटको ये धरती है शैतान की.
बंदी में है हम , बंदी में है____!!!

"बायको आणि ती"



प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात येतात दोन जणी.
एक बायको आणि एक ती .......................... ;)

कधी बायको आधी, अन नंतर येते ती.
कधी बायकोच्या आधी, college पासून ती.

मजेत असत married life त्या दोघीं मुळे,
घरात बायको अन बाहेर तिच्या मुळे.

दोघीं मुळे life कस comfortable असत.
घरात बायको अन बाहेर तिच्या वर dipend असत.

दोघीं बरोबर सगळ काही अस adjust होत,
life त्यांच्या शिवाय hell होऊन जात.

जरी असल्या दोघी तरी काही problem नसतो.
बायकोच अन तीच relation normal असत.

फिरायला तिघही एकत्रच असतो,
दोघीनाही कारण काहीच complex नसतो.

काय म्हणता? आयुष्यात तुमच्या नाहीत दोन जणी? :(
म्हणजे लग्न झाल नाही? का नाही तुमच्या कडे गाडी?

प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात असतात दोन जणी
एक बायको आणि एक गाडी............ :D

कधी बायको आधी, अन नंतर येते गाडी.
कधी बायकोच्या आधी, college पासून गाडी.

जितक्या जुन्या तितक्याच दोघी आवडत असतात
कितीही दिला त्रास तरी हव्याहव्याशा वाटतात.

जुनी बायको अन जुनी गाडी सारख्याच असतात,
ज्याच्या असतात त्यालाच त्यांचे नखरे माहित असतात.

देखणी बायको दुसर्याची, तरी आपली सोडववत नाही
नवीन model छान तरी जुनी गाडी बदलवत नाही.

बायको जाता माहेरी घराबाहेरच रहाव वाटत.
गाडी जाता ग्यारेजला घरातच बर वाटत.

कलियुगी पती - चारित्र्याची हीच खरी निशाणी,
आयुष्यभर व्रती जो, एक पत्नी, अन एक गाडी.

Friday, September 16, 2011

एकच..........


एकच चहा, तो पण कटिंग...      
एकच पिक्चर, तो पण टॅक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...   
अजुन काय हवे असते मित्राकडुन  ?
एकच कटाक्ष, तो पण हळुच...     
एकच होकार, तो पण लाजुन....
एकच स्पर्श, तो पण थरथरुन...    
अजुन काय हवे असते प्रियेकडुन  ?
एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवुन...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडुन...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आजीकडुन  ?
एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन...
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन...
अजुन काय हवे असते आईकडुन  ?
एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण ह्रदयावर दगड ठेवुन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोग-या आवाजातुन...
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन...
अजुन काय हवे असते वडीलांकडुन  ?
सगळ्यांनी खुप दिले, ते पण न मागुन...
स्वर्गच जणु मला मिळाला, ते पण न मरुन...
फाटकी हि झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन  ?

आंतरजालावरुन साभार....

Sunday, September 11, 2011

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला.

घर कसे रिकामे रिकामे आणि उदास वाटत होते. गणपती विसर्जन करून आल्यानंतर बाप्पासाठी केलेली ती रिकामी मखर, ते सजवले छत जणू काही आम्हाला तोंड वाकडे करून वाकुल्या दाखवीत होती. १० दिवस गणपती बाप्पा घरी राहिला, अगदी परीवारातालाच एक सदस्य असल्याप्रमाणे. १० दिवस घरात कसे अगदी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते त्या गणरायाला आज निरोप देताना अंतकरण भरून आले होते. बाप्पाला तर डोळे भरून पाहू सुद्धा शकलो नव्हतो. गेल्या वर्षी पर्यंत आमचे एकत्र कुटुंबात राहत होतो. त्यामुळे बाप्पा ची प्रत्येक गोष्ट माझ्या नजरेखालून जात होती. बाप्पा ची मखर, साड्यांची सजावट, गौरी पूजनाची व्यवस्था प्रत्येकात माझा सहभाग असायचा. कामावरून आल्यानंतर १६ तास बाप्पा माझ्या नजरे समोर असायचा. या वर्षी सुद्धा हि सर्व जबाबदारी मीच सांभाळली बाप्पाची मखर आणि इतर सजावट सुद्धा मीच केली, बाप्पा घरी आणणे, त्याची यथासांग पूजा हे सर्व मीच केले, पण मन काही भरले नाही. त्याचे कारण म्हणजे जागा कमी पडत असल्याने जून मध्ये मी नवीन ठिकाणी (नर्हेगाव) शिफ्ट झालो. सण मात्र जुन्या घरीच (हिंगणे खुर्द ) साजरे करायचे ठरले होते. पण जुने घर आणि नवीन घर यामध्ये ६ ते ७ किलोमीटर चे अंतर असल्याने आणि सकाळ सकाळी ऑफिसला जायची घाई असल्यामुळे फक्त संध्याकाळीच आरती करण्या च्या निमित्ताने आम्ही हिंगण्यात यायचो, आणि बाप्पाचे दर्शन व्हायचे. माझ्याकडून बाप्पाची सेवा म्हणावी अशी काही घडली नाही. बाप्पाला एक विनंती करावीशी वाटते कि हे विघ्नहर्त्या गजानना, माझ्याकडून काही चुकले असेल तर क्षमा कर, पण तुझ्यापासून मला दूर लोटू नकोस, तुझ्या सेवेपासून मलाच काय कोणालाच वंचित ठेवू नकोस. हीच तुझ्या चरणी प्रार्थना...     गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.......