Friday, October 29, 2010

गणपति बाप्पा मोरया...........

'मंगलमूर्ति'  मंगल ज्याची मुद्रा आहे असा तो,  मंगल मूर्ति..  की  ज्याच्या नुसत्या नाम स्मरानाने पापांचा समूळ विनाश होतो, ज्याच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. जो विघ्न विनाशक आहे, अशा त्या विघ्नाहर्त्याने माझी चिंता दूर करून माझ्याकडून सेवा कशी करून घेतली त्याचा हा छोटासा सारांश. वेळ मिळेल अणि जमेल तसा मी आमच्या सिंहगड रोड येथील सिद्धिविनायाकाच्या मंदिरात दर्शनास जातो. पण अलीकडे त्या माझ्या होम लोन च्या गडबड़ीमुले मला काय जाने जमत नव्हते.  मंगलवार दिनांक २६ ओक्टोबर १० रोजी मी  एका सरकारी कार्यालयात गेलो होतो. दिवसभर मी त्यांचा दिनक्रम बघत होतो. त्यांची एकंदरीत कामाची पद्धत व् गहालपना पाहून मला खुप वाईट वाटले.   पण नाईलाज होता. मनोमन गणेशाला प्रार्थना केलि की उशीर झाला तरी चालेल पण आज काम होऊ दे, उद्या परत या वातावरणात यायची माजी इच्छा नाही. दोन तासात व्हायचे माझे काम संध्याकाली ५.३० वाजता झाले.  ऑफिसला तीन तासात येतो म्हननारा मी त्या दिवशी ऑफिसला जाऊ शकलो नाही. तड़क तिथून निघालो. घरी सिंहगड रोडला येइपर्यंत सात वाजले. मनात विचार केला आज बाप्पा मुलेच आपले काम झाले. नाहीतर पुन्हा उद्या आपले काही खरे नव्हते. बप्पच्या दर्शनाला जयाचे ठरवले. झटकन आंघोळ केली नि बायको पुराना घेउन मी बप्पाच्या मंदिरात हजार झालो. बाप रे बाप ही भली मोठी रांग. नारळ हार घेउन आम्ही रांगेत उभे राहिलो. आमचा नंबर आला तेव्हा भटजी बुवा ओरडले " चला आरतीची वेळ झाली. आणि चक्क गाभार्यात उभे राहून आम्हाला आरतीचे भाग्य मिळाले. आरती झाल्यानंतर माझ्या बायकोला प्रसाद वाटण्याचे भाग्य मिळाले. प्रसाद म्हणून श्रीफल ही मिळाला.  अचानक मिळालेल्या या संधिने किंवा माझे मन फारच प्रफुल्लित झाले. बप्पाने बरोबर माझ्याकडून त्याची सेवा साध्य करून घेतली. आणि एक प्रकारे माझ्या पुढील सर्व योजनाना आशीर्वाद ही दिला.
              दुसर्या दिवशी समजले की बरेच दिवस चाललेला माझ्या होम लोन च अध्याय लवकरच पूर्णत्वास येणार होता.  हा तर बप्पाचाच आशीर्वाद.  
गणपति बाप्पा मोरया...........
मंगल मूर्ति मोरया ................

Thursday, October 28, 2010

नमस्कार मंडळी,
कशी वाटली ही माझी कविता? तुमचा अभिप्राय मला नक्की पाठवा. या कवितेबरोबर मी माझा ब्लॉग सुरु करीत आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचविन्याचा प्रयत्न करीत आहे. आपला प्रतिसाद स्वागतार्ह आहे.

आपला,

Wednesday, October 27, 2010

चल जाऊया ......


  
चल कुठेतरी जाऊ या, लांब.... दुरवर...
आकाशाला गवसणी घालु या... चल जाऊ या              
असं लालभोर आकाश मी कधीच पाहिले नव्हते,
ते सुद्धा या आधी कधी भरुन आले नव्हते..       
आज त्याला करकचुन मिठी मारुया.... चल जाऊया ........
चल कुठेतरी जावुया...  जिथे फक्त आणि फक्त हिरवळ असेल..
ग्रिष्माचा जिथे स्पर्शहि झाला नसेल......
मऊ मुलायम हिरवळीवरती थोडसं अनवाणी चालुया.... चल जावुया.....
चल कुठेतरी जावुया दुरवर रानात...
डोंगर-रांगांमध्ये द-यात आणि खो-यात,
जाऊ निसर्गात खोलवर, कधी पाण्याच्या तळाशी, तर कधी टेकावर,
हा पवित्र श्वास हद्यात साठवुया........... चल जाऊ या..
चल कुठेतरी जाऊया.. हातात हात घालुन..
गुजगोष्टी करुया, निवांत एकांतात बसुन...
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर जगण्याचे गुपित उमगले..
एकमेकांच्या मनात काय आहे ते आज आपणांस समजले..
चल एकमेकांची मने समजुन घेऊया.... चल जाऊया....

किसन ढेकणे