Thursday, September 22, 2011

प्रिये,


तुझ्या आठवणींनी माझे मन पाण्यात
टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदखदते आहे.
प्रत्येकवेळी “O2″ आत घेताना आणि “CO2″ बाहेर
सोडताना मला तुझीच आठवण येते.
तुला हातात ठेवण्याचा कितीही प्रयत्न
केला तरीसुद्धा तु हवेत
उघड्या ठेवलेल्या ‘नेप्थॅलीनप्रमाणे’ उडुन
जातेस. त्या विरहात माझे ह्र्दय
‘यलो फॉस्फरस’ प्रमाणे भुर्कन जळुन गेले. तु
असशील तेथुन लोहकणांसारखी चुंबकाकडे
आकर्षित हो !
मला अजुन ते दिवस आठवतात,
जेव्हा प्रयोग शाळेत बसून
मी तुझ्या डोळ्यांतील “अल्कोहोल” पीत
असे. त्या नाजुक ओठातील ‘ग्लुकोज’
खाण्याचा मोह मला अनेक
वेळा टाळावा लागला. ‘ऍक्टीव्हेटेड
कंपाऊंड’ प्रमाणे असणारे तुझे सरळ केस,
एका ओळीत लावलेल्या ‘टेस्ट ट्यूब’ प्रमाणे
तुझे सुंदर दात, तुझ्या नाकातील
चमकी’Ring Test’मध्ये येणाऱ्या Ring
प्रमाणे भासे , तर कानातील रिंगा ‘
physical balance’ मधील
पारड्याप्रमाणे लटकत असत.
दोन वेगळे रंग दाखवणाऱ्या ‘लिट्मस
पेपरप्रमाणे’ तुझी व्रुत्ती आहे, हे माहीत
नव्हत मला. आपण ‘बेन्झीन’ आणि ‘ऑईलचे’
मिश्रण आहोत हे माहीत नव्हत मला.
आता सारेच संपले आहे.
तुझ्या प्रिलिमनरी टेस्ट्मध्ये पास
होऊनसुद्धा.
 
तुला धरणारा ब्युरेट स्टॅंण्ड....
 
आंतरजालावरून साभार..........

No comments:

Post a Comment