Thursday, May 5, 2011

पुण्यातील बेताल दुचाकीस्वार


काल परवा सकाळ सकाळचीच गोष्ट. मी नेहमीप्रमाणे  ऑफिसला निघालो होतो. सेनापती बापट रोडवर पॅन्टलुन च्या चौकात सिग्नल ला थांबलो. रेड सिग्नल होता... ग्रीन झाला... गाडीला किक मारुन निघालो.....ईतक्यात ऊजवीकडुन ओम सुपर मार्केट चौकातुन एक बाईकस्वार अचानक सिग्नल तोडुन आम्हाला क्रॉस करुन वेगाने निघुन गेला. किर्र र्र र्र.......  सर्वांनी जागीच ब्रेक दाबले. आम्ही सगळे जागीच थबकलो. अपघात होता होता वाचला. हिरवा सिग्नल लागल्यामुळे आम्ही नुकतेच निघालो होतोच तेवढ्यात  .......?????  आणि हे सर्व इतक्या कमी वेळेत घडल्यामुळे वाहतुक नियंत्रकाला सुद्धा त्याच्या गाडीचा नंबर पाहाता आला नाही. इतका बेदरकारपणा ? कुठे चाललिय हि आजची तरुणाई ? अशा बेताल दुचाकिस्वारांना कोणी धडा शिकवील काय? अशा रायडर्स मुळे सामान्य नागरिकांचे रस्त्यावर चालणे धोक्याचे झाले आहे.... यावर कोणी काही उपाय सुचवील काय ?

Monday, May 2, 2011

आणि ओसामा बिन लादेन मेला........

आणि अमेरिकेने सतत दहा वर्षे चालवलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले.... कुविख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन अखेर मारला गेला. मला आजही तो दिवस आठवतोय... ज्या दिवशी या लादेनच्या सहका-यांनी अमेरिकी सरकारच्या ११० मजली वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला केला होता. तब्बल तीन हजार निष्पाप जीव या क्रुत्याने बळी पडले होते. ४०० मिलियन डॉलर्स खर्च करुन बांधलेल्या या ट्विन टॉवर्सचा चक्काचुर झाला होता. अमेरिकेचे हे झालेले नुकसान भरुन निघण्यासारखे तर नव्हते. पण अमेरिकन सरकारने तातडीने पाऊल उचलले आणि लादेनचा तळ असलेल्या अफगाणिसतानवर हल्ला केला.... त्यानी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले...आपण कधी देणार
      मुंबईवर हल्ला करणा-या कसाबला अशी शिक्षा आपण कधी देणार....? संसदेवर हल्ला करणार्या अफजल गुरु ला फाशी कधी देणार ? की आपण फक्त त्याच्यावर  खटला चालविणार ?आणि त्याला तोपर्यंत पोसत राहाणार,आणि काही वर्षांनी इतर घोटाळ्याप्रमाणेच याला सुद्धा विसरुन जाणार ???