Wednesday, November 2, 2011

शांतता

शांतता शून्यात आली त्यास दे तू ताल आता
भान शब्दांचे उडाले जाग तू खूशाल आता

कोवळीशी झोप माझी, जागवीली तू कशाला
आज स्वप्नातून माझ्या सोबतीने चाल आता

लाजणारे ओठ माझे, लूट केली तू कळीची
हाय! थट्टा रंगली, झाले कळीचे हाल आता

सोडतो तू काय रे ,या बंधनाच्या त्या मिठीला
रात नाही ती तुझी, घे कुंतलेची शाल आता

माळले चाफ्यांवरी ,तू मोगरीला का अवेळी
अंबरी आहे अजूनी तारकांची झाल आता.....
अंतर जाला वरून साभार.......

No comments:

Post a Comment