Wednesday, October 27, 2010

चल जाऊया ......


  
चल कुठेतरी जाऊ या, लांब.... दुरवर...
आकाशाला गवसणी घालु या... चल जाऊ या              
असं लालभोर आकाश मी कधीच पाहिले नव्हते,
ते सुद्धा या आधी कधी भरुन आले नव्हते..       
आज त्याला करकचुन मिठी मारुया.... चल जाऊया ........
चल कुठेतरी जावुया...  जिथे फक्त आणि फक्त हिरवळ असेल..
ग्रिष्माचा जिथे स्पर्शहि झाला नसेल......
मऊ मुलायम हिरवळीवरती थोडसं अनवाणी चालुया.... चल जावुया.....
चल कुठेतरी जावुया दुरवर रानात...
डोंगर-रांगांमध्ये द-यात आणि खो-यात,
जाऊ निसर्गात खोलवर, कधी पाण्याच्या तळाशी, तर कधी टेकावर,
हा पवित्र श्वास हद्यात साठवुया........... चल जाऊ या..
चल कुठेतरी जाऊया.. हातात हात घालुन..
गुजगोष्टी करुया, निवांत एकांतात बसुन...
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर जगण्याचे गुपित उमगले..
एकमेकांच्या मनात काय आहे ते आज आपणांस समजले..
चल एकमेकांची मने समजुन घेऊया.... चल जाऊया....

किसन ढेकणे 

No comments:

Post a Comment